no images were found
सांगली जिल्ह्याचे आमदार, खासदार, पालक मंत्री यांची बुद्धी चालत नसेल तर राजकारण बंद करून काम धंदा बघावा -सतीश साखळकर
सांगली : आज कष्टकऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड सांगली. येथे कवलापूर विमानतळ जागेबाबत पत्रकार परिषद बोलवण्यात आली. कवलापूर जमिनीच्या वाटपा बाबत सुरू असलेला गैरप्रकार व उद्योजक लोकांची मागणी डावलून जमिनीचे वाटप करण्याचा सुरू असलेला डाव उधळून लावण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकांच्या विकासासाठी आणि स्थानिक मुलांच्या भविष्यासाठी कवलापूर विमानतळ जागेवर विमानतळच होणे गरजेचे आहे असे बैठकीत निर्णय झाला. कवलापूर विमानतळाच्या बाबतीत स्पाइस पार्क आणि नवा कृष्णा व्हॅलीने जो प्रस्ताव दिला आहे तो सर्व पक्षीय कृती समिती सांगली , उद्योजक यांना विश्वासात न घेता दिलेला प्रस्ताव असल्याने त्यास आमचा विरोध राहील. सांगलीच्या विकासाला विमानतळाची गरज आहे. सांगलीचे नवयुवक ,उद्योजक, डॉक्टर अशा सर्व घटकांना विमानतळाची गरज आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री कशासाठी निवडून येत असतील माहीत नाही. सर्व सामान्य नागरिक म्हणुन आम्ही इथे टाहो फोडतोय यांच्या ऑफिसला जाऊन भेटायचे, यांना पत्र द्यायची यांची बुद्धी चालत नाही तर राजकरण न करता यांनी कामधंदा बघावा असे श्री सतीश साखळकर म्हणाले.
सरकारी गुंडांना थांबवणे आणि धन दांडगे यांना जागा हडप करून देणार नाही हा आमचा उद्देश आहे. कवलापूर जागेचे फेर सर्वेक्षण करा. नसेल तर सर्व समावेशक उद्योग किंवा युनिव्हर्सिटी शाखा या जागेवर सुरू व्हावी .शिष्टा कंपनीला कवडीमोल दराने जागा देऊन जागा हडप करण्याचा डाव आहे. केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणानुसार स्थानिक मुलांच्या भविष्याचा विचार करून ,स्थानिक नागरिकांचा विचार केला नाही. शासन आणि लोकप्रतिनिधी काही करत नाहीत. शासनाच्या जागेवर स्थानिक उद्योजकांना प्राधान्य दिले जात नाही. यासाठी प्रथम पालक मंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात येईल. या नंतर ही निर्णय झाला नाहीतर याबाबत हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल. सर्व घटकांना, संघटनांना एकत्र घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा पै. पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे.