
no images were found
बालकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप
कोल्हापूर : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून 9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करून निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या विश्वास उर्फ बंडा लोहार याला आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीन ऍडव्होकेट मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं
मरळी (ता. करवीर ) येथील सरदार सुतार यांचा मरळी फाटा येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. व्यवसायिक ओळखीतून त्यांनी तिसंगी येथील विश्वास उर्फ बंडा लोहार याला चाळीस हजार रुपये हात उसने दिले होते. दरम्यान, हातउसणे घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार यानं फिर्यादी सरदार सुतार यांच्या ९ वर्षीय प्रदीप सुतार या बालकाचं अपहरण करून खून केल्याची घटना नोव्हेंबर २०१७ मध्ये घडली होती. याप्रकरणी सरदार सुतार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार यांच्या विरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी याप्रकरणी तपास करून आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होत. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी 9 वर्षीय बालकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तिसंगी येथील आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ऍड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिलंय.