
no images were found
अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन
कोल्हापूर : अधीक्षक डाकघर कोल्हापूर विभागाच्यावतीने दि.28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.
कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, वस्तु /मनीऑर्डर/ बचत खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी.
संबंधितानी डाक सेवे बाबतची तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर ए.व्ही.इंगळे, अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ४१६००३ यांच्या नावे दोन प्रती सह दिनांक 24 डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.