no images were found
शिवाजी विद्यापीठाला गार्डन क्लब पुष्प स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद
‘क्वीन ऑफ दि शो’सह विविध ३० गटांत पटकावली एकूण ४९ पारितोषिके
कोल्हापूर : येथील गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५२व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठास सलग तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या गुलाबास ‘क्वीन ऑफ दि शो’चा बहुमानही लाभला. दि. १७ व १८ डिसेंबर २०२२ रोजी ही स्पर्धा महावीर गार्डन येथे पार पडली.
विद्यापीठाने विविध पुष्प स्पर्धांमध्ये एकूण १७ प्रथम क्रमांक, १४ द्वितीय क्रमांक आणि १८ तृतीय क्रमांक अशा एकूण ४९ पारितोषिकांसह ‘सर्वसाधारण विजेतेपद’ पटकावले. विद्यापीठाच्या दुरंगी गुलाबास ‘क्वीन ऑफ दि शो’ या प्रदर्शन व स्पर्धेचा आज सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ झाला.
यावेळी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या जीएसटी विभागाच्या सह-आयुक्त सुनिता थोरात यांच्या हस्ते विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, स्वच्छता निरीक्षक शशिकांत साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आर.एल. तावडे फौंडेशनच्या शोभा तावडे यांच्यासह गार्डन क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, कोषाध्यक्ष राज अथणे आदी उपस्थित होते.