Home क्राईम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर

0 second read
0
0
114

no images were found

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर

मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने राज्याचं राजकारण चांगलच तापलं. विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी सदर घटना योग्य नसल्याचे म्हटले. शाईफेक झाल्यानंतर या प्रकरणात मनोज घरबडेसह अन्य तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या तिघांना आता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. अशात पुण्यातच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात स्पष्ट दिसत आहे की, त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मात्र तरी देखील दोषींवर ३०७ कलमासह अन्य मोठी कलमे लावण्यात आली आहेत. शनिवारी शईफेकीची घटना घडली त्यानंतर लगेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिघांविरोधात ३०७ कलम लावल्याने विरोधक चांगलेच संतापले होते. ३०७ कलम खुनाचा प्रयत्न केल्यास लावले जाते. मात्र प्रत्यक्ष घटना तशी नसून पाटलांवर फक्त शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे यात कुठेही खुनाचा प्रयत्न नसून लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यानंतर मंगळवारी ३०७ कलम कमी करण्यात आले होते.
वकील सचिन भोसले यानी या विषयी सांगितले की, तिघांनीही फक्त शाईफेक केली होती. कुणाचाही जीव घेण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेले ३०७ चे कलम पोलिसांवर दबाव असल्याने लावण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…