no images were found
ओटीपीविना मिस्ड् कॉलने खात्यातून चोरले ५० लाख, फसवणुकीचा नवा फंडा!
मंबई : आता ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे फंडे वापरले जात असल्याचे समोर आले आहे. ओटीपी न विचारता दिल्लीतील एका व्यक्तीच्या खात्यातून मिस्ड कॉलद्वारे ५० लाख रुपये गायब केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे सायबर पोलीसही चक्रावून गेले असून याचा तपास करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
मोबाईल कॉल, एसएमएस, ईमेल, वन-टाइम-पासवर्ड (ओटीपी) आदी माध्यमातून ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार आतापर्यंत घडलेले आहेत. अशा सायबर फसवणुकीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी सायबर क्राइम पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पण दक्षिण दिल्लीतील सुरक्षा सेवांचे संचालक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या खात्यातून ऑनलाईनच्या माध्यमातून ५० लाख रुपये काढले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी संध्याकाळी ७ ते ८.४५ या दरम्यान या व्यक्तीच्या सेल फोनवर वारंवार ब्लँक आणि मिस्ड कॉल्स आले. त्याने काही कॉल्सकडे दुर्लक्ष केले. नंतर काही वेळाने फोनची रिंग झाल्यानंतर त्यांनी फोन उचलला. तेव्हा पुढून कोणीही बोलले नाही. तथापि, काही वेळानंतर, जेव्हा त्या व्यक्तीने संदेश पाहण्यासाठी मोबाइल फोन तपासला. तेव्हा रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) म्हणजेच सुमारे ५० लाख रुपये खात्यातून ट्रान्सफर झाल्याचा मेसेज पाहून त्यांना धक्काच बसला.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार झारखंड राज्यामधील जामतारा भागातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर चौकशीत असे आढळून आले आहे की, एका मंडळाच्या खात्यावर सुमारे १२ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तर ४.६ लाख रुपये अविजित गिरी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले आहेत. याशिवाय आणखी दोन खात्यांवर सुमारे १० लाख रुपये पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार झारखंडमधील जामतारा भागातील असण्याची शक्यता तपासातून समोर आली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले, त्यांनी कमिशनसाठी आपली खाती भाड्याने दिली असण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगारांनी केलेली ही सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात सायबर गुन्हेगाराने व्यक्तीकडून कोणतीही माहिती घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी फक्त मिस्ड कॉलद्वारे फसवणूक केली. सिम स्वॅप तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगाराने वारंवार मिस्ड कॉल आणि ब्लँक एसएमएस पाठवले. त्यानंतर ओटीपी डायव्हर्ट करून सुमारे 50 लाख रुपये लुटले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
RTGS हस्तांतरण सुरू करण्यासाठी आणि OTP सक्रिय करण्यासाठी मिस्ड कॉल केले जातात. त्यानंतर गुन्हेगार जवळच्या कॉलच्या IVR मध्ये नमूद केलेला OTP मिळवतात. एकदा सिम कार्ड सक्रिय झाल्यानंतर गुन्हेगार फोन नंबर मिळवतात आणि त्यातून कॉल किंवा मजकूर प्राप्त करतात