Home क्राईम गुंडाच्या टोळीकडून शिवणेत बारची तोडफोड

गुंडाच्या टोळीकडून शिवणेत बारची तोडफोड

0 second read
0
0
304

no images were found

गुंडाच्या टोळीकडून शिवणेत बारची तोडफोड

पुणे :- शिवणे येथील बार मालकाकडे मागितलेला ५ हजार रुपयेचा हप्ता आणि फुकट दारू देण्यास नकार दिल्याने एका गुंडाच्या टोळीने बरची तोडफोड केली.

या प्रकरणी एका सराईतासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश शिंदे याच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५५, रा. इंगळे कॅार्नर, एनडीए रस्ता, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे यांचा शिवणे परिसरात ॲपल रेस्टो बार आहे. शिंदे आणि साथीदार मद्यालयात आले होते. दरमहा पाच हजार रुपये तसेच फुकट दारू देण्याची मागणी शिंदे आणि साथीदारांनी मद्यालयातील व्यवस्थापकाकडे केली होती. व्यवस्थापकाने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. ग्राहकांना धमकावले तसेच मद्यालयाची तोडफोड करुन आरोपी पसार झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…