Home राजकीय राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा : आदित्य ठाकरे

राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा : आदित्य ठाकरे

0 second read
0
0
130

no images were found

राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा : आदित्य ठाकरे

सावंतवाडीत केसरकरांना आव्हान

सावंतवाडी :  ‘रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती प्रहार केला.

‘चिपी विमानतळाचे काम आपण केले आहे. आता श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी इकडून तिकडून कुणी तरी पुढे आले आहे. आपण कोकणासाठी अनेक काम केले निधी मंजूर केला. पण, त्या कामांना या बेकायदेशीर आणि गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली. पण, हे सरकार एक दीड महिन्यात कोसळणार आहे, हे लिहून घ्या, महाराष्ट्र अशी गद्दारी कधीच खपवून घेणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…