
no images were found
मोबाईल चोरीच्या वादातून आठवीच्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये खून
नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात असलेल्या जामिया शिक्षण संकुलातील बंद वसतिगृहात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. अक्कलकुवा पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी मोबाईल चोरीच्या झालेल्या घटनेच्या संशयातून हा खून झाल्याचा आरोप केला जात आहे.
चाकूने भोकसून पंधरा वर्षीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. मोबाईल चोरीवरुन दोन विद्यार्थ्यांचा वाद झाला होता. त्यानंतर एकाने दुसऱ्याची हत्या केली. त्यानंतर जुन्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वसतिगृहाच्या बाथरुममध्ये मृतदेह फेकून दिला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनंतर पोलीसांनी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवामध्ये जमिया शैक्षणिक संकुलातील १५ वर्षीय विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे.
इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या गुजरातच्या अहमदाबाद येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वसतिगृहाच्या स्नानगृहात आढळला आहे.सोबत शिकणाऱ्या अल्पवयीन मित्रानेच विद्यार्थ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मोबाईल चोरीच्या झालेल्या घटनेवरून संशयातून खून केल्याचे समोर आले आहे . सीसीटीव्ही वरून आरोपीला अक्कलकुवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपी हा बिहारमधील रहिवाशी आहे आणि तो अक्कलकुवाच्या जामिया शिक्षण संकुलात मयत विद्यार्थ्याच्या सोबत शिक्षण घेत होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.