Home Uncategorized टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च; भारतातील पहिली फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च; भारतातील पहिली फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल

40 second read
0
0
12

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च; भारतातील पहिली फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल

नवी दिल्ली,  : टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आज नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च करण्याची घोषणा केली. भारतातील ही पहिली फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल असून, यामध्ये सेल्फ-चार्जिंग हायब्रिड टेक्नॉलॉजीची सुविधा आणि E20 ते E85 पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणांचा वापर करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सुविधा आणि विश्वास मिळणार आहे. इनोव्हा हायक्रॉसच्या विश्वासार्हता आणि ब्रँडवरील विश्वासाची परंपरा पुढे नेत या नवीन मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, प्रीमियम कम्फर्ट आणि अधिक सोयीस्कर फीचर्स देण्यात आले आहेत.

   एएफव्ही-एसएचईव्ही टेक्नॉलॉजीच्या समावेशामुळे नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलने टोयोटाच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाला आणखी पुढे नेले आहे. यामध्ये इलेक्ट्रिफिकेशन आणि फ्लेक्सिबल फ्युएल क्षमता यांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले फ्लेक्स-फ्युएल इंजिन आणि ई-ड्राइव्ह टेक्नॉलॉजी यामुळे ही गाडी भारतासाठी उपयुक्त आणि शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्याच्या टोयोटाच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. तसेच देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना मदत करण्यासाठीही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.

     या गाडीची भारत आणि जपानमधील टोयोटाच्या इंजिनिअरिंग टीमने देशभरात सविस्तर टेस्टिंग केली. या टेस्टिंगदरम्यान शहरातील रस्ते, महामार्ग, डोंगराळ भाग आणि खडबडीत रस्त्यांसह विविध भारतीय ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये गाडीची गुणवत्ता आणि कार्यक्षमता तपासण्यात आली. तसेच वेगवेगळ्या हवामान परिस्थितींमध्येही तिची चाचणी घेण्यात आली. गाडीची एकूण कार्यक्षमता, मजबुती आणि विश्वासार्हता तपासून ती टोयोटाच्या गुणवत्ता मानकांनुसार असल्याची खात्री करण्यात आली.

    नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल सादर करताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. मासाकाझू योशिमुरा म्हणाले, “टोयोटामध्ये आमचा विश्वास आहे की ऊर्जा परिवर्तन आणि कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी एकच उपाय पुरेसा नाही. विशेषतः भारतासारख्या विविध गरजा असलेल्या देशात मोबिलिटीच्या गरजाही वेगवेगळ्या आहेत. नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनसोबत E20 ते E85 पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणांचा वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. असे व्यावहारिक उपाय ग्राहक आणि समाजाच्या हितासाठी उपयुक्त ठरतील, तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना पाठबळ देतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

     या नवीन गाडीबाबत बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तदाशी असाझुमा म्हणाले, “नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल ही इनोव्हाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाची पुढची पायरी आहे. यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी, प्रीमियम कम्फर्ट आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करणारे अधिक पर्याय देण्यात आले आहेत. एफएफव्ही-एसएचईव्ही टेक्नॉलॉजी, आकर्षक डिझाइन, अधिक कम्फर्ट आणि सोयीस्कर फीचर्समुळे ग्राहकांना अधिक चांगला मोबिलिटी अनुभव मिळेल. तसेच ग्राहकांना आवडणारी इनोव्हाची विश्वासार्हता आणि वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत. मोबिलिटीच्या गरजा अधिक शाश्वत पर्यायांकडे वळत असताना, नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीची सुविधा आणि E20 ते E85 पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य मिळते. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि मनःशांती मिळेल.”

     गाडीच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट (सेल्स, सर्व्हिस आणि युज्ड कार बिझनेस) श्री. सबरी मनोहर म्हणाले, “नवीन इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलची रचना अधिक प्रीमियम आणि बहुउपयोगी अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये बाह्य डिझाइनमध्ये बदल करण्यासोबतच इंटिरिअरही अधिक आकर्षक आणि आरामदायी करण्यात आले आहे. नवीन फ्रंट बंपर आणि ग्रिल, नव्याने डिझाइन केलेले प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प्स आणि डबल-स्टॅक्ड एलईडी डीआरएल्समुळे गाडीला अधिक आकर्षक आणि आधुनिक लूक मिळतो. तसेच ३१.२ सेंटीमीटर (१२.३ इंच) आकाराची मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि टीएफटी डिस्प्लेमुळे गाडीतील अनुभव अधिक चांगला होतो. प्रशस्त आणि आरामदायी केबिन, आधुनिक सेफ्टी टेक्नॉलॉजी आणि नवीन G हायब्रिड व GX हायब्रिड ग्रेड्सच्या समावेशामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळणार आहेत. E20 ते E85 पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणांचा वापर करण्याची सुविधा देतानाच इनोव्हाची आरामदायी प्रवास, सोयीस्कर सुविधा आणि विश्वासार्हतेची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.”

   किंमत आणि उपलब्धता : नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड G हायब्रिड (नवीन), GX हायब्रिड (नवीन), VX हायब्रिड आणि ZX हायब्रिड या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल. या गाडीची एक्स-शोरूम किंमत १९,९९,००० रुपयांपासून सुरू होते. G हायब्रिड 7S आणि 8S (स्पीड लिमिटिंग फंक्शन ग्रेड) ची किंमत १९,९९,००० रुपये, GX हायब्रिड 7S ची किंमत २३,९९,००० रुपये, GX हायब्रिड 8S ची किंमत २४,०४,००० रुपये, VX हायब्रिड 7S ची किंमत २८,७९,००० रुपये, VX हायब्रिड 8S ची किंमत २८,८४,००० रुपये आणि ZX हायब्रिड 7S ची किंमत ३१,९९,००० रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रिडसाठी बुकिंग २६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. याशिवाय, यापूर्वीची इनोव्हा हायक्रॉस GX गॅसोलीन व्हेरिएंट भारतात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. या व्हेरिएंटमध्ये १७.८ सेंटीमीटर आकाराचा मोठा MID डिस्प्ले आणि R17 मोठी अलॉय व्हील्स देण्यात आली आहेत. GX गॅसोलीन 7S ची एक्स-शोरूम किंमत १९,५९,००० रुपये, तर GX गॅसोलीन 8S ची किंमत १९,६४,००० रुपये आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर : …