शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीचा उत्साह कोल्हापूर(प्रतिनिधी) : ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा जल्लोषी आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साही जयघोषाच्या निनादात शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या शोभायात्रा, हलगी, लेझीम, ढोल व झांजपथकाचे उत्कृष्ट सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत अश्वारुढ युवक यांमुळे विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय झाला. विद्यापीठात आज सकाळी ठीक साडेआठ वाजता …