आधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या डिझाईनला पेटंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश कोल्हापूर,: येथील संशोधकांनी विकसित केलेल्या “मॅग्नेटिक स्टिरर विथ पार्टिशन्ड ऑइल बाथ” या आधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या संरचनेला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. विविध शास्त्रीय अभिक्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या यंत्राचे डिझाईन तयार करण्यात राजाराम महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी योगदान दिले आहे. राजाराम महाविद्यालयातील डॉ. सूरज अशोक सोनवणे, अनिल पांडुरंग मराळे, …