Home Uncategorized केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी; आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून रूटची पाहणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी; आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून रूटची पाहणी

32 second read
0
0
6

no images were found

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारीआयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून रूटची पाहणी

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या १९ व २० जून २०२६ रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून विविध नागरी सुविधा, स्वच्छता आणि देखभाल कामांची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी सायंकाळी दौऱ्याच्या संभाव्य मार्गाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

            आयुक्त डॉ. भारुड यांनी खानविलकर पेट्रोल पंप चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, श्री महालक्ष्मी मंदिर परिसर, धैर्यप्रसाद चौक, रेसिडेन्सी क्लब, पोलिस ग्राउंड, सर्किट हाऊस, धैर्यप्रसाद चौक ते कावळा नाका चौक, शिवाजी विद्यापीठ रोड तसेच शाहू टोल नाका या प्रमुख मार्गांची पाहणी केली.

यावेळी रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, धोकादायक झाडे व फांद्यांची छाटणी, अतिक्रमण निर्मूलन, पार्किंग व्यवस्था बॅराकटिंग तसेच इतर आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहाय्यक आयुक्त सौ.स्वाती दुधाने, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, सुरेश पाटील, अरुण गवळी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा‘ देशभरातील महिलांमध्ये आर…