कोल्हापूर, दि. 4 : मान्सून सुरु झाला तरी पावसाने मात्र तुरळक हजेरी लावत महिनाभर दडी मारली होती. जिल्ह्यात आज दिवसभरात पावसाने दमदार हजेरी लावली. खोळंबलेली शेतीची कामे आणि पेरण्या यामुळे चिंतेत असलेला शेतकरी सुखावला. आज सकाळ पासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने संततधार वृष्टी झाली. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला यामुळे सर्वच नद्या, ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. …