आपल्या भागात जे पिकते, ते खाणेच शरीरासाठी उपयुक्त: प्रा. रेखा दिवेकर कोल्हापूर(प्रतिनिधी) : निसर्ग हा आपला सर्वात मोठा काळजीवाहू अन्नदाता आहे. आपल्या परिसरात जे अन्नधान्य पिकते, ते खाणेच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आणि उपयुक्त असते. त्यामुळे आपण अशा पदार्थांनाच आपल्या आहारामध्ये महत्त्व देणे योग्य आहे, असा सल्ला आहारतज्ज्ञ प्रा. रेखा दिवेकर यांनी दिला. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागाने या वर्षी हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्याच बरोबर …