लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी प्रा. आर.के. पुरी यांच्या स्मरणार्थ पाच लाख कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉ. आर.के. पुरी यांच्या स्मरणार्थ पाच लाख रुपयांच्या निधीचा धनादेश त्यांच्या पत्नी प्रा. विजया पुरी यांनी नुकताच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. शिवाजी विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. …