‘आप’ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकदीने उतरणार कोल्हापूर (प्रतिनिधी):सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची वाट मोकळी झाली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.येणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीने केली. नव्या नेतृत्वाला …