भूमिकेसाठी भीतीवर मात…‘आमच्या लाडक्या नाईक बाई’साठी ऐश्वर्या नारकर यांनी पुन्हा हाती घेतली सायकल दोन चाकांवरचा प्रवास… प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा! स्टार प्रवाहवरील आमच्या लाडक्या नाईक बाई ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर शारदा ही मध्यवर्ती भूमिका साकारत असून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर तितक्याच वास्तववादी पद्धतीने उभी राहावी यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अनेक वर्षांनंतर …