रमणमळा परिसरात पुन्हा गवा आला कोल्हापूर : शहरातील रमणमळा परिसरात उसाच्या फडात गव्यांच्या कळपाने वनविभागाची झोप उडवली आहे. मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मंगळवारी, गव्यांच्या कळपाने शंभर फुटी रोडवर उसाच्या …