महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस हरपला!आमदार अमल महाडिक महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. राजकारणातील एक उमदा आणि स्पष्टवक्ता नेता काळाने हिरावून नेला. मिश्किल आणि ओघवती भाषणशैली, प्रशासनावरील मजबूत पकड आणि दिलखुलासपणे वावर यामुळे अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय होते. सामान्य कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातल्या प्रत्येक …