39 जवानांसह बस नदीपात्रात कोसळली, 6 जणांचा मृत्यू श्रीनगर : जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 39 जवान होते. आतापर्यंत या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोr आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.