no images were found
१ व २ रोजी ए, बी, ए, ई वार्डमध्ये पाणीपुरवठा होणार नाही
कोल्हापूर : शिंगणापूर योजनेवरील 1100 मीमी मुख्य वितरण नलिकेवरील गळती काढण्याचे काम सोमवार, दि.1 ऑगस्ट 2022 रोजी हाती घेण्यात येणार आहे. या गळतीचे प्रमाण लक्षात घेता गळती काढण्यासाठी संपूर्ण पाणी उपसा प्रक्रिया बंद करून गळती काढावी लागणार आहे. त्यामुळे शिंगणापूर जल उपसा केंद्रावर अवलंबून असणा-या शहरातील ए, बी, व ई वॉर्ड, सलग्नीत उपनगर या भागांमध्ये सोमवार, दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार दि.2 ऑगस्ट 2022 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार होईल. या भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणेच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.