Home Uncategorized शिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखत

शिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखत

2 second read
0
0
12

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखत

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. ही मुलाखत बुधवार (दि. १८), गुरुवार (दि. १९) व शुक्रवार (दि. २०) असे सलग तीन दिवस सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि ‘News On AIR’ ॲपद्वारे प्रसारित होणार आहे.

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी मुलाखत घेतली आहे. शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६४ वर्षांच्या वाटचालीत दर्जेदार शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थीभिमुख शिक्षणपद्धती, ‘कमवा आणि शिका’ योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याअनुषंगाने वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या एकंदरीत वाटचालीवर कुलगुरू डॉ. राजनीश कामत या मुलाखतीमध्ये प्रकाश टाकणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीसह संशोधन क्षेत्रातील योगदान, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, फिल्म मेकिंग, मोबाईल जर्नालिझम यासारखे कौशल्याधारित अभ्यासक्रम, इनोव्हेशन आणि स्टार्टअप उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन व मार्गदर्शन याविषयी कुलगुरु डॉ. कामत माहिती देणार आहेत. तसेच विद्यापीठातील विविध विभाग आणि अध्यासनांचे कार्य, महात्मा गांधी अध्यासन, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, संत तुकाराम अध्यासन यांच्या माध्यमातून सुरु असलेले अध्यापन,  संशोधन व समाजोपयोगी उपक्रम, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर याबाबतही कुलगुरु डॉ. कामत यांनी मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दुष्काळाचे सावट असलेल्या सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष मदत पॅकेज द्या, गाळप उसाला प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडं मागणी

दुष्काळाचे सावट असलेल्या सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष …