Home सामाजिक जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

12 second read
0
0
5

no images were found

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा : ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क व सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध – सहायक आयुक्त सचिन साळे

 कोल्हापूर, : समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य सचिव सचिन साळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क व सुरक्षेबाबत बोलताना म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अनुभवसमृद्ध पाया असून, त्यांच्या सन्मान व हक्कांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन आणि समाज कल्याण विभाग कटिबद्ध आहे.

      सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती आणि महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, लोहा (जि. नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ आणि विशेष सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. रुईकर कॉलनी येथील महालक्ष्मी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

       कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या तसेच वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये प्राचार्य वसंतराव ज्ञानदेव माने (92), फेस्कॉम कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे माजी अध्यक्ष दिलीप श्रीरंग पेटकर (85), महाराष्ट्र हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री. माळकर (84), जयसिंगपूर येथील शशिकला चौधरी (84) आणि यशवज्ञानू पाटील (82)  गौरव करण्यात आला.

         समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी 12 ते 2 या वेळेत ज्येष्ठ नागरिकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष सांस्कृतिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. निवेदक अमोल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

      कार्यक्रमास राज्य ज्येष्ठ नागरिक संघ, कोल्हापूरचे अध्यक्ष, विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी, महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, लोहा (जि. नांदेड)चे प्रतिनिधी मोहन सातपुते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कविता गायकवाड, सहायक लेखा अधिकारी, चित्रा शेंडगे, अतुल पवार, स्वाती रूकडे आणि सुनील पाटील, समाजकल्याण निरीक्षक तसेच कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्ह्यातील 200 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

दररोज बदामांचे सेवन केल्याने प्रौढांमध्ये झोपेच्या जाणवणाऱ्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते

दररोज बदामांचे सेवन केल्याने प्रौढांमध्ये झोपेच्या जाणवणाऱ्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मद…