no images were found
एपीएसईझेडच्या कोलंबो वेस्ट टर्मिनलची क्षमता दुप्पट, 3.2 दशलक्ष पर्यंत वाढ एकूण 750 दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक
कोलंबो, : श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिनी अमरसूर्या यांनी आज अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड)च्या कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल (सीडब्ल्यूआयटी)च्या 750 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या फेज-II विस्ताराचे उद्घाटन केले. या विस्तारामुळे सीडब्ल्यूआयटीची क्षमता 1.6 दशलक्ष टीईयूवरून वाढून 3.2 दशलक्ष टीईयू झाली आहे. या विस्तारामुळे 2028 पर्यंत कोलंबो बंदराच्या 13 दशलक्ष टीईयू क्षमतेच्या उद्दिष्टापैकी जवळपास 25% माल हाताळण्याची सीडब्ल्यूआयटीची क्षमता आणखी मजबूत होईल.
2024 मध्ये कामकाजाच्या पहिल्याच वर्षात 1 दशलक्ष टीईयू माल हाताळणारे सर्वात वेगवान टर्मिनल बनल्यानंतर, सीडब्ल्यूआयटीने कोलंबो बंदराच्या इतिहासात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. टर्मिनलने कामकाज सुरू केल्यानंतर अवघ्या 18 महिन्यांत 2 दशलक्ष टीईयू माल हाताळले आहेत.
श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिनी अमरसूर्या म्हणाल्या, “कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलचे यश हे दाखवून देते की मजबूत विचार, विश्वासार्ह भागीदारी आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या मदतीने श्रीलंका काय साध्य करू शकतो. विक्रमी वेळेत 2 दशलक्ष टीईयू माल हाताळणे आणि आज फेज-IIची सुरुवात होणे ही केवळ कोलंबो बंदरासाठीच नाही, तर आपल्या देशाच्या आर्थिक भविष्यासाठीही महत्त्वाची कामगिरी आहे. जागतिक व्यापाराचे केंद्र म्हणून श्रीलंका आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. सीडब्ल्यूआयटीसारख्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्माण होत आहेत, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आकर्षित होत आहेत, स्पर्धा वाढत आहे. तसेच, हिंद महासागरातील प्रमुख सागरी आणि लॉजिस्टिक्स हब बनण्याच्या आमच्या उद्दिष्टाला यामुळे अधिक बळ मिळत आहे.”
क्षमता वाढल्यानंतर सीडब्ल्यूआयटी एकाच वेळी तीन अतिशय मोठ्या कंटेनर जहाजांना बर्थ करू शकेल. यामुळे पूर्व-पश्चिम व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोलंबोचे स्थान आणखी मजबूत होईल.
एपीएसईझेडचे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ अश्वनी गुप्ता म्हणाले, “750 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीतून सीडब्ल्यूआयटीची क्षमता दुप्पट करून 3.2 दशलक्ष टीईयू करणे, हे एपीएसईझेड आणि जगभरातील शिपिंग कंपन्यांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवते. फेज-II हा एपीएसईझेडच्या आंतरराष्ट्रीय पोर्टफोलिओसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि हिंद महासागरातील प्रमुख व्यापार मार्गांवरील आमचे स्थान आणखी मजबूत करतो. वाढीव क्षमता, पूर्णपणे ऑटोमेटेड सिस्टम आणि खोल पाण्यातील पायाभूत सुविधांमुळे सीडब्ल्यूआयटी कोलंबोचे प्रमुख ट्रान्सशिपमेंट गेटवे म्हणून काम करण्यास आणि श्रीलंकेच्या आयात-निर्यात मालवाहतुकीला अधिक चांगली सुविधा देण्यासाठी सज्ज आहे.”
जॉन कील्स ग्रुपचे चेअरपर्सन कृष्ण बालेंद्र म्हणाले, “सीडब्ल्यूआयटी आणि कोलंबो बंदर या दोन्हींसाठी ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. अवघ्या 18 महिन्यांत 2 दशलक्ष टीईयू माल हाताळणे हे या भागीदारीच्या यशाचे प्रतीक आहे. टर्मिनलच्या विस्तारामुळे कोलंबोला प्रमुख ट्रान्सशिपमेंट हब म्हणून आणखी मजबूत करण्याच्या आणि या क्षेत्रातील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून श्रीलंकेच्या विकासाला हातभार लावण्याच्या संधी वाढल्या आहेत. एपीएसईझेड आणि श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत या प्रवासाचा भाग बनल्याचा आम्हाला आनंद आहे.”
सीडब्ल्यूआयटी हे श्रीलंकेतील पहिले पूर्णपणे ऑटोमेटेड डीप-वॉटर कंटेनर टर्मिनल आहे. जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांना हाताळण्यासाठी हे टर्मिनल तयार करण्यात आले आहे. टर्मिनलचे कामकाज पूर्णपणे इलेक्ट्रिफाइड आहे आणि टेलपाइपमधून होणारे उत्सर्जन शून्य आहे. सीडब्ल्यूआयटीने आतापर्यंत 1.7 कोटी सुरक्षित कामाचे तास पूर्ण केले आहेत. ही कामगिरी टर्मिनलची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तसेच कामकाज आणि पर्यावरणीय कामगिरी दर्शवते.