Home धार्मिक देवदर्शन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रणव आणि करण अदाणी यांनी सहकुटुंब घेतले चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रणव आणि करण अदाणी यांनी सहकुटुंब घेतले चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन

1 second read
0
0
8

no images were found

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रणव आणि करण अदाणी यांनी सहकुटुंब घेतले चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन

अदाणी एंटरप्रायझेसचे संचालक श्री. प्रणव अदाणी आणि अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) चे व्यवस्थापकीय संचालक श्री.करण अदाणी यांनी आपल्या कुटुंबीयांसह गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चिंचपोकळीचा चिंतामणी येथे गणरायाचे दर्शन घेतले व प्रार्थना केली.

अदाणी एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक (अॅग्रो, ऑइल अँड गॅस) आणि संचालक प्रणव अदाणी म्हणाले, “चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळासोबत भागीदारी करण्याचा आम्हाला खरोखरच सन्मान वाटतो. 107व्या वर्षात पदार्पण केलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणीचा समृद्ध वारसा हा भक्ती, एकता आणि मुंबईच्या सांस्कृतिक हृदयाचे प्रतीक राहिला आहे.”

चिंचपोकळीचा चिंतामणी हे मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने सार्वजनिक गणपती मंडळ असून, यंदा ते 107व्या वर्षात आहे. या मंडळाची मुळे शहराच्या पूर्वीच्या कापड गिरण्यांच्या पट्ट्यातील परळ, गिरगाव आणि लालबाग या परिसरांशी जोडलेली आहेत. तसेच, घरगुती स्वरूपातील गणेश चतुर्थीच्या उत्सवाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करणारे स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वारशाची परंपराही हे मंडळ पुढे नेत आहे. टिळकांनी 1890च्या दशकात गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.

वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांसाठीची आपली परंपरा कायम ठेवत, यंदाचा उत्सव दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यशैलीच्या भव्यतेपासून प्रेरणा घेत एक इमर्सिव्ह अनुभव देत आहे. यंदाची गणेशमूर्ती तिरुमला तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर बालाजी यांच्या संकल्पनेवर आधारित असून, गरुड, कीर्तिमुख, शंख, चक्र आणि कापूर तिलक यांसारख्या पारंपरिक पवित्र प्रतीकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

भव्य मंडपामध्ये हैदराबाद आणि भुवनगिरी येथील श्री वेंकटेश्वर मंदिराच्या (स्वर्णगिरी) स्थापत्यवैभवाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यात उंच गगनचुंबी गोपुरे, पवित्र दीपस्तंभ तसेच शिल्पबद्ध याली/व्याळ रक्षक आकृत्यांचा समावेश आहे.

सुरुवातीच्या काळात गिरणी कामगारांनी या उत्सवात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1982 मधील गिरणी संप आणि त्यानंतर झालेल्या नागरी परिवर्तनाच्या काळातील अनेक उलथापालथींनंतरही चिंचपोकळीचा चिंतामणी हा परिसराच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. जवळपास 5,000 योगदानकर्त्यांसह चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या पलीकडे जाऊन आरोग्यसेवा आणि शिक्षणविषयक उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे.

1939 पासून चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस गणेशोत्सवाचे आयोजन केले जात आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून या गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे. गणेशोत्सवाच्या पलीकडेही संस्थेने आपल्या सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवली असून, रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक उपक्रम आणि मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात मंडळाने सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप मर्यादित केले आणि आरोग्याशी संबंधित उपक्रमांवर भर दिला. यामध्ये चाचणी शिबिरे, वैद्यकीय मदत आणि रक्तदान मोहिमांचा समावेश होता.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देवदर्शन
Comments are closed.

Check Also

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अम…