Home Uncategorized विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

33 second read
0
0
5

no images were found

विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील : व्यवसाय परवाना न घेतल्याने महापालिका व अग्निशमन विभागाची संयुक्त कारवाई

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता तसेच परवाना विभागाकडे अर्जही दाखल न करता सुरू ठेवण्यात आलेल्या ताराबाई रोडवरील आरिफ मनेर यांच्या लॉजिंगवर महानगरपालिकेच्या परवाना व अग्निशमन विभागाने आज धडक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित लॉजिंग सील करण्यात आली. हि कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

            ताराबाई रोड येथील तीन मजली इमारतीमध्ये लॉजिंग विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी संबंधित परवाना विभाग तसेच अग्निशमन विभागाकडून नियमानुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी व्यवसाय परवाना घेतला नाही. तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेला अर्जही दाखल केला नव्हता.

            त्यामुळे नियमानुसार आज महापालिकेच्या परवाना व अग्निशमन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत लॉजिंग सील केली.

            ही कारवाई परवाना अधीक्षक अशोक यादव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी जयवंत खोत, विजय सुतार, परवाना निरीक्षक संदीप भोई, शिवाजी कोकरे, भोलानाथ पाटणकर, अग्निशमन व परवाना विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन

            कोल्हापूर शहर हद्दीतील सर्व व्यावसायिक व आस्थापनाधारकांनी महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना प्राप्त केल्यानंतरच व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घन…