Home उद्योग उत्कृष्ट ईएसजी कामगिरीसाठी एनएसई सस्टेनेबिलिटी कडून अदाणी पॉवरला मान्यता

उत्कृष्ट ईएसजी कामगिरीसाठी एनएसई सस्टेनेबिलिटी कडून अदाणी पॉवरला मान्यता

15 second read
0
0
7

no images were found

उत्कृष्ट ईएसजी कामगिरीसाठी एनएसई सस्टेनेबिलिटी कडून अदाणी पॉवरला मान्यता

“ऍस्पिरिंग ” श्रेणी प्राप्त; थर्मल पॉवर क्षेत्रात आघाडी कायम

अहमदाबाद,: भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील थर्मल पॉवर निर्मिती कंपनी असलेल्या अदाणी पॉवर लिमिटेडने (एपीएल) आज जाहीर केले की,एनएसई सस्टेनेबिलिटी कडून करण्यात आलेल्या एनवायरमेंटल ,सोशल अँड गव्हर्नन्स (ईएसजी) कामगिरीच्या मूल्यांकनात कंपनीने आणखी सुधारणा नोंदवली आहे. कंपनीला 66 गुण मिळाले असून, आर्थिक वर्ष26 मधील 65 गुणांच्या तुलनेत ही सुधारणा आहे.

      एपीएल ने भारतातील इतर सर्व प्रमुख थर्मल, मिश्र इंधन आणि एकात्मिक ऊर्जा (इंटिग्रेटेड एनर्जी) कंपन्यांच्या तुलनेत आपले उच्च स्थान कायम राखले आहे. हे कंपनीची ईएसजी बाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी आणि शाश्वत विकासासोबत जबाबदार व्यावसायिक पद्धतींवर असलेला भर दर्शवते. कंपनी “ऍस्पिरिंग ” श्रेणीत कायम आहे.

    एनएसई सस्टेनेबिलिटी ही एनएसई इंडिसेज ची उपकंपनी असून, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ग्रुप चा भाग आहे आणि ती सेबी-नोंदणीकृत ईएसजी रेटिंग प्रोव्हायडर आहे.आपल्या वार्षिक ईएसजी मूल्यांकनाचा भाग म्हणून,ती भारतातील 500 सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्यांकन करते आणि गुंतवणूकदार तसेच भागधारकांना कंपनीच्या ईएसजी निकषांवरील कामगिरीचे आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीच्या क्षमतेचे स्वतंत्र मूल्यांकन उपलब्ध करून देते. उच्च ईएसजी स्कोअरमुळे भागधारकांचा कंपनीच्या सुशासनाबाबत, उदयोन्मुख जोखमींना सामोरे जाण्याच्या क्षमतेबाबत, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षकतेबाबत आणि कालांतराने शाश्वत मूल्य निर्माण करण्याच्या क्षमतेबाबत अधिक विश्वास निर्माण होतो.

     अदाणी पॉवरचा विविध ईएसजी उपक्रमांवर सातत्यपूर्ण भर आणि कार्यक्षमतेतील उत्कृष्टता यांचे सर्वोत्तम उद्योग मानकांच्या आधारे बेंचमार्किंग केले जाते. कंपनीने कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी अल्ट्रा-सुपरक्रिटिकल युनिट्स सारख्या प्रगत कमी-उत्सर्जन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली आहे आणि सातत्यपूर्ण देखरेख तसेच सुधारात्मक प्रणालींमध्ये गुंतवणूक केली आहे. ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपाययोजनांसोबतच, कंपनीने आपल्या कार्यप्रणालीदरम्यान जलसंधारण आणि जबाबदार कचरा विल्हेवाटीला प्राधान्य दिले आहे.

    सामाजिक क्षेत्रात, कंपनीने समुदाय विकास कार्यक्रमांचा विस्तार केला असून, त्यामध्ये शिक्षण, आरोग्यसेवा आणि समुदायांसाठी कौशल्यविकासावर विशेष भर देण्यात आला आहे. वंचित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि उपजीविका वृद्धी प्रकल्प यांसारखे उपक्रम सर्वसमावेशक विकासासाठी अदाणी पॉवरची बांधिलकी दर्शवतात.

     शासनाच्या बाबतीत, अदाणी पॉवरने निर्धारित नियामक आवश्यकतांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. नामांकन आणि मोबदला कमेटी मधील स्वतंत्र संचालकांचे प्रमाण अनुपालनासाठी आवश्यक असलेल्या निकषांपेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे, ऑडिट कमेटी मधील स्वतंत्र संचालकांचे प्रतिनिधित्व वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा अधिक आहे आणि जोखीम व्यवस्थापन कमेटी ची रचना देखील आवश्यक असलेल्या स्वतंत्र संचालकांच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. कंपनीने पुरवठादार आणि कंत्राटदारांसाठी कठोर ईएसजी मानके देखील स्वीकारली आहेत,ज्यामुळे संपूर्ण मूल्यसाखळीत जबाबदार व्यावसायिक पद्धती सुनिश्चित होतात.

    इतर अलीकडील रेटिंगमध्ये,एपीएल ने एस अँड पी ग्लोबल च्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट (सीएसए) मध्ये 71/100 असा उत्कृष्ट स्कोअर मिळवला असून, एफटीएसई रसेल ईएसजी रेटिंग मध्ये 4.3/5.0 गुण प्राप्त केले आहेत. आर्थिक वर्ष 26 साठी, केअरएज ईएसजी रेटिंग मध्ये एपीएल ला 80/100 गुणांसह (‘लीडरशिप पोजिशन) स्थान मिळाले असून, कंपनीने उद्योगाच्या मध्यकापेक्षा 35% अधिक चांगली कामगिरी केली आहे. या स्वतंत्र मूल्यांकनांमुळे एपीएल ची ईएसजी विषयाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ होत असून, कंपनी या दिशेने सातत्याने कार्यरत राहण्यास कटिबद्ध आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वा…