Home Video डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड

9 second read
0
0
4

no images were found

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड
इचलकरंजी(प्रतिनिधी ):-डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील सौरभ मगदूम व निशींगधा पाटील याची सहाय्यक अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीमध्ये वार्षिक रु. १३ लाख पॅकेजवरती नोकरीसाठी निवड झाली आहे. सध्या सिव्हील इंजिनिअरींग क्षेत्रात सरकारी नोक-यांची मोठया प्रमाणावर मागणी आहे. या संधीचा लाभ डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना मिळावा,या हेतुने डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी सरकारी नोकरीसंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत असून सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डीकेटीई एक सक्षम मंच ठरत आहे अशी प्रतिक्रया यावेळी विद्यार्थी व पालकांनी दिली.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश उल्लेखन्नीय आहे. संस्थेमध्ये उपलब्ध असलेले सुसज्ज लायब्ररी, अत्याधुनिक सॉफ्टवेरर्स अधुनिक शिक्षण सुविधा, विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षा व सरकारी नोकरीसाठी सक्षम बनवत आहे. याच गुणवत्तेच्या बळावर, सिव्हील इंजिनिअरींग विभागातून विद्यार्थ्यांचे शंभर टक्के प्लेसमेंटकडे वाटचाल सुरु आहे. डीकेटीईचा सिव्हील इंजिनिअरींग विभाग,विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आधारित ज्ञान देण्यास नेहमी कटिबध्द आहे. भविष्यात अधिकाअधिक विद्यार्थ्यांची सरकारी नोक-यांमध्ये निवड व्हावी, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशिल राहील,असा विश्‍वास संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी व्यक्त केली.
सदर विद्यार्थ्याच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ एस.के.पाटील यांचे मागदर्शन मिळाले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या̵…