Home सामाजिक डॉ. फिक्सिट ने पंढरपूर वारी 2026 मध्ये वारकऱ्यांसाठी संरक्षणाचे आपले वचन अधिक दृढ केले

डॉ. फिक्सिट ने पंढरपूर वारी 2026 मध्ये वारकऱ्यांसाठी संरक्षणाचे आपले वचन अधिक दृढ केले

16 second read
0
0
4

no images were found

डॉ. फिक्सिट ने पंढरपूर वारी 2026 मध्ये वारकऱ्यांसाठी संरक्षणाचे आपले वचन अधिक दृढ केले

~ ‘पानी है बाहर,सूखा है अंदर’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करत वारकऱ्यांसाठी चालते छत, तंबू आणि विशेष ड्रायिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध ~

भारत,: पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडचा वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्स ब्रँड डॉ. फिक्सिट ने महाराष्ट्रातील सर्वाधिक पूजनीय आध्यात्मिक यात्रांपैकी एक असलेल्या पंढरपूर वारी 2026 मध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना सहकार्य करून घरांच्या पलीकडे जाऊन संरक्षणाचे आपले वचन अधिक दृढ केले. डॉ. फिक्सिट पंढरपूर वारी 2026 या ऑन-ग्राउंड उपक्रमांतर्गत पावसाळ्यातील वातावरणात यात्रा करणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, चालते छत (Walking Roof Shades) वारकऱ्यांसोबत संपूर्ण प्रवासात होते, ज्यामुळे त्यांना पावसापासून संरक्षण मिळाले आणि मार्गात विश्रांतीचे क्षण अनुभवता आले. तसेच, तंबूंची व्यवस्था करून भाविकांना थांबून विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली, तर विशेष ड्रायिंग स्टेशनमुळे पावसात भिजल्यानंतर स्वतःला कोरडे करून ताजेतवाने होण्याची सुविधा मिळाली. याशिवाय, अनिश्चित हवामानापासून अतिरिक्त संरक्षण मिळावे म्हणून रेनकोटचेही वितरण करण्यात आले, ज्यामुळे वारकऱ्यांना त्यांचा प्रवास अधिक आरामात सुरू ठेवता आला.

या उपक्रमाविषयी बोलताना पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी श्री. संदीप तनवानी म्हणाले, “पिडिलाइटमध्ये आम्ही मानतो की, जिथे लोकांना संरक्षणाची सर्वाधिक गरज असते तिथे ते पोहोचले, तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. यावर्षी डॉ. फिक्सिटच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर वारीतील आमच्या वचनबद्धतेला आणखी एक पाऊल पुढे नेत प्रथमच मोबाईल ड्रायिंग स्टेशनची सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे पावसाळ्यात वारकऱ्यांना स्वतःला कोरडे करून अधिक सहजतेने त्यांची यात्रा पुढे सुरू ठेवता येईल. यासोबतच, चालते छत, संरक्षणात्मक रेन गिअर आणि तंबूंच्या माध्यमातूनही आम्ही यात्रेदरम्यान भाविकांना सहकार्य करत आहोत. या पवित्र परंपरेचा भाग होण्याचा आणि श्रद्धा व भक्तीच्या या अद्वितीय प्रवासात वारकऱ्यांसोबत उभे राहण्याचा आम्हाला अभिमान आहे.”

या उपक्रमात ऑन-ग्राउंड अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आर्च गेट्स,मनगटी पट्ट्या (Wristbands) आणि टी-शर्ट्स यांचाही समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण यात्रेदरम्यान वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहकार्याला अधिक बळ मिळाले.

गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून, डॉ. फिक्सिटने आपल्या वॉटरप्रूफिंग कौशल्याच्या माध्यमातून भारतभरातील 1,000 कोटी चौरस फूटांहून अधिक बांधकाम क्षेत्राचे संरक्षण केले आहे. पंढरपूर वारीशी असलेल्या या सहभागाद्वारे कंपनीने संरक्षणाचे आपले वचन केवळ इमारतींपुरते मर्यादित न ठेवता लोकांपर्यंत आणि समाजापर्यंत विस्तारले असून, त्यांच्या प्रवासात अर्थपूर्ण सहकार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या̵…