no images were found
शनायाचे रक्षण करण्यापासून ते तिच्या भूतकाळाचा शोध घेण्यापर्यंत: सोनी सबच्या पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पाची मातृसुलभ भावना केंद्रस्थानी
मुंबई, : सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल पुन्हा एकदा गुंतागुंतीच्या कौटुंबिक नात्यांचा शोध घेत आहे. शनायाच्या (मुस्कान बामने) भूतकाळाबद्दल सत्य जाणून घेण्याच्या पुष्पा (करुणा पांडे) यांच्या निर्धारामुळे तिचे चिराग (नितिन बाबू) आणि शनायाशी मतभेद होतात. मनवा (रसिका धोंडले) कॅनडाला गेल्यामुळे दुखावलेला चिराग पोलिसांची नोकरी सोडतो आणि शहर सोडण्याचा निर्णय घेतो. दरम्यान, पुष्पा गुपचूप पोलिस स्टेशनमध्ये जाऊन शनायाच्या आई‑वडिलांच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांचा शोध घेते. मात्र ती पकडली जाते आणि अटक होते. चिराग तिची मदत करतो, पण पुष्पा शनायाच्या भूतकाळात हस्तक्षेप करत राहते यामुळे तो संतापतो.
आगामी एपिसोड्स, पुष्पा तिचा शोध सुरू ठेवते, तर शनाया ठामपणे सांगते की तिला जुन्या जखमा पुन्हा उघडायच्या नाहीत किंवा आईला भेटायचं नाही. जेव्हा चिराग आणि शनाया समजतात की पुष्पा बेंगळुरूला जाऊन मंसीला (शनायाची आई) भेटण्याचा विचार करत आहे, तेव्हा ते दोघे तिला थांबवण्यासाठी एकत्र निघतात. यामुळे त्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची अनपेक्षित संधी मिळते. मात्र, पुष्पा आधीच मंसीला भेटते आणि मंसी स्पष्टपणे सांगते की तिला मुलीला भेटायचं नाही. शनायाला वाटतं की हा अध्याय संपला आहे, पण राशीच्या (अक्षया हिंदळकर) बाळाच्या नामकरण सोहळ्यात तिला कळतं की मंसी बापोडा चाळीबाहेर तिची वाट पाहत आहे.
शनाया अखेर त्या आईला सामोरी जाईल का, जिला ती वर्षानुवर्षं विसरण्याचा प्रयत्न करत होती? आणि मंसीच्या अनपेक्षित परतण्यामुळे शनायाच्या भूतकाळाबद्दलच्या तिच्या सगळ्या समजुती बदलतील का?
मुस्कान बामने, जी शनायाची भूमिका साकारते, म्हणाली, “शनायाचं तिच्या भूतकाळाशी नातं खूप गुंतागुंतीचं आहे. कधी कधी जेव्हा काहीतरी तुम्हाला खोलवर दुखावून जातं, तेव्हा तुम्हाला वाटतं की त्या जखमा पुन्हा उघडण्यापेक्षा त्यांना गाडून ठेवणं चांगलं. मला ती भावना समजते कारण आपल्यापैकी प्रत्येकाकडे अशा आठवणी असतात ज्या आपण पुन्हा अनुभवू इच्छित नाही. शनायासाठी हा ट्रॅक रोचक बनतो कारण तिला पुष्पाने हस्तक्षेप करावा असं वाटत नाही, पण तिला हेही माहित आहे की पुष्पाच्या भावना प्रेमातून येतात. मंसीच्या अनपेक्षित आगमनामुळे सगळं बदलतं आणि आता शनायाला ठरवावं लागेल की ती इतक्या काळापासून टाळत असलेल्या गोष्टीला सामोरी जाण्यास तयार आहे का.”