no images were found
हसीना मलिकच्या रुपात गुलकी जोशी ची एंट्री
नई पीढी नए किस्से या मालिकेत प्रसिद्ध पोलीस अधिकारी हसीना मलिकच्या रूपात गुलकी जोशीची एंट्री होत आहे. ‘मॅडम सर’ मालिकेत गुलकी जोशीने केलेली हसीना मलिकची व्यक्तिरेखा खूप गाजली होती. हसीना मलिकच्या चाहत्यांना तिचा बेडरपणा, तिची हुशारी आणि न्याय-निष्ठा फारच आवडली होती. आता गुलकी अभिनीत ही व्यक्तिरेखा या मालिकेत एक गुंतागुंतीची केस सोडवण्यासाठी आली आहे. त्यामुळे पडद्यावर पुन्हा तिचा मोहकपणा आणि करारीपणा जिवंत होईल. आगामी कथानकात सखी (चिन्मयी साळवी)ची मैत्रीण प्रियंका ज्या प्रकरणात गुंतली आहे, त्याचा शोध घेण्यासाठी हसीना येणार आहे. प्रियंकाच्या शीलावर हल्ला झाल्याचे हे प्रकरण आहे. महिला सुरक्षेची गरज अधोरेखित करणाऱ्या या कहाणीत हसीना मलिक तपास हाती घेऊन गुन्हेगाराला कायद्याच्या बेडीत अडकवण्यासाठी कंबर कसेल.
वागले कुटुंबीय आणि साई दर्शन सोसायटीचे सदस्य यांना एकत्र आणणारे हे एपिसोड भावुक करणारे आहेत. आणि, प्रियंकाला न्याय मिळवून देण्यासाठी हसीन मलिक सिद्ध आहे.वागले की दुनिया मालिकेत वेळोवेळी संबद्ध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यात येतो आणि सामान्य माणसाला सहान कराव्या लागणाऱ्या आव्हानांबाबत जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. आगामी कथानक हे त्याच दिशेने उचललेले एक अर्थपूर्ण पाऊल आहे. यावेळी महिला सुरक्षेचा विषय आहे आणि या कथानकातून लोकांना या महत्त्वाच्या सामाजिक समस्येबाबत विचार करण्यास प्रवृत्त करून समाजात बदल आणण्यासाठी प्रेरित करण्याचा उद्देश आहे.
मालिकेतल्या आपल्या स्पेशल एंट्रीविषयी बोलताना गुलकी जोशी म्हणाली, “एका अत्यंत संबद्ध समस्येला तोंड फोडणाऱ्या या कथानकाच्या एका महत्त्वाच्या वळणावर मी ‘वागले की दुनिया’ मालिकेत दाखल होत आहे.हसीना मलिक नेहमीच न्यायाच्या बाजूने उभी असते. केवळ एक प्रकरण सोडवून चालणार नाही, तर गुन्हेगार कितीही शक्तीशाली असले तरी न्याय प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे. आपल्या आसपास घडत असलेल्या अशा स्वरूपाच्या इतर प्रकरणांबाबत देखील जागरूकता यायला हवी. या महत्त्वपूर्ण कथानकात मला सामील करून घेतल्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे. एक संगठित समाज काय करू शकतो हे दाखवणारे हे कथानक आहे.”
राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “हे कथानक दर्शविते की, वागले की दुनिया मालिकेची भूमिका काय आहे. ही मालिका सामाजिक समस्या प्रामाणिकपणे आणि हृदयस्पर्शी दृष्टिकोनातून हाताळते. ही एक भावनिक आणि ज्वलंत कहाणी आहे. न्यायासाठी समुदायाने संगठित होण्याची ताकद यातून दाखवली आहे. हसीन मलिकच्या रूपात गुलकीचा या मालिकेत प्रवेश स्वागतार्ह आहे. ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली आहे आणि ती न्यायाच्या बाजूने उभी राहणारी व्यक्तिरेखा आहे. आम्हाला आशा आहे की, ही कहाणी समाजातील बदलास प्रेरित करेल आणि महिला सुरक्षेशी संबंधित समस्या हाताळण्याबाबत बदल घडवेल.”