14 second read
0
0
6

no images were found

इंडसइंड बँकेकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून दोन टिप्पर वाहन

कोल्हापूर : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहर विकासाला चालना देण्यासाठी शहरातील 15 राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड कमर्शिअल बँकांनी सीएसआरच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार आज इंडसइंड बँक कोल्हापूर यांच्यावतीने सीएसआर फंडातून महापालिकेला हायड्रोलिक टिप्पर देण्यात आले.

            इंडसइंड बँकेचे रिजनल हेड व्हर्दिन्हो गोंदिन्हो यांनी महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे हे वाहन औपचारिकरित्या सुपूर्द केले. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, आरोग्य विशेष समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर, आरोग्य विशेष समिती उपसभापती वैभव माने, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक जयंत पाटील, ऋतूराज क्षिरसागर, अभिजीत खतकर, अशकीन आजरेकर, स्वरूप कदम, अजय इंगवले, बबन मोकाशी, वैभव कुंभार, नगसेविका सौ.मंगला साळोखे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, इंडसइंड बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर नितेश पाखले, इंफोसॅन सर्विसेसचे अजय रामाने आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यश

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यश कोल्हापूर: देवभूम…