Home Uncategorized विझिंजम बंदरातून आयात-निर्यात कामकाज सुरू; भारताच्या जागतिक व्यापारासाठी नवा मार्ग खुला

विझिंजम बंदरातून आयात-निर्यात कामकाज सुरू; भारताच्या जागतिक व्यापारासाठी नवा मार्ग खुला

42 second read
0
0
5

no images were found

विझिंजम बंदरातून आयात-निर्यात कामकाज सुरू; भारताच्या जागतिक व्यापारासाठी नवा मार्ग खुला

तिरुवनंतपुरम, : विझिंजम इंटरनॅशनल सीपोर्टमध्ये पूर्ण क्षमतेने निर्यात-आयात (EXIM) कामकाज सुरू झाले आहे. या कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. व्ही. डी. सतीशन, केरळचे उद्योगमंत्री पी. के. कुन्हालीकुट्टी, आमदार श्री. एम. व्हिन्सेंट, भारत सरकारच्या सागरी प्रशासनाचे महासंचालक श्री. श्याम जगन्नाथन, आयएएस, तसेच सागरी क्षेत्रातील भागीदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. EXIM कामकाज म्हणजे देशातून परदेशात पाठवला जाणारा निर्यातीचा माल आणि परदेशातून देशात आणला जाणारा आयातीचा माल हाताळणे. यासोबतच विविध आंतरराष्ट्रीय जहाज सेवांमधील ट्रान्सशिपमेंट म्हणजे एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल हस्तांतरित करण्याचे कामही केले जाते.

केरळचे मुख्यमंत्री श्री. व्ही. डी. सतीशन म्हणाले, “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. विझिंजम आता जगाशी जोडणारे प्रवेशद्वार बनले आहे. ‘मिशन समुद्र’च्या माध्यमातून या संधीचा पुरेपूर फायदा घेणे हे आता आमच्यासमोरील आव्हान आहे. विझिंजमला केंद्रस्थानी ठेवून रस्ते आणि रेल्वे जोडणी मजबूत करणे तसेच खासगी गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. रिंग रोडसाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी सरकार 3,200 कोटी रुपये देणार आहे. तसेच खासगी गुंतवणूक आणण्यासाठी चर्चाही सुरू झाली आहे.”

भारतामधील सर्वात मोठ्या एकात्मिक वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि पूर्णवेळ संचालक अश्वनी गुप्ता म्हणाले, “विझिंजम हे केरळमधील प्रतिभा, भारतातील उद्योग आणि कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा यांना जागतिक बाजारपेठेशी जोडणारे नवे प्रवेशद्वार आहे.” ते म्हणाले की, या बंदराचा उद्देश केवळ मालाची वाहतूक करण्यापुरता मर्यादित नाही. भारताला आत्मनिर्भर बनवणे, जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक क्षमता वाढवणे आणि सागरी क्षेत्रात भारताचे नेतृत्व मजबूत करणे, हा देखील या बंदराचा महत्त्वाचा उद्देश आहे.

विझिंजम बंदरातील गुंतवणूक ही केरळच्या विकासासाठी अदानी समूहाच्या मोठ्या बांधिलकीचा एक भाग आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पुढे नेला जात आहे. फेज-2 मधील गुंतवणुकीनंतर विझिंजम प्रकल्पातील अदाणी समूहाची एकूण गुंतवणूक 30,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. केरळमध्ये कोणत्याही उद्योग समूहाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. या गुंतवणुकीमुळे महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वाढवणे, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था मजबूत करणे तसेच राज्यात व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी अधिक चांगले वातावरण तयार करण्यास मदत होईल.

EXIM कामकाज सुरू झाल्यामुळे भारताच्या सागरी व्यापाराच्या कार्यक्षमतेवरही मोठा परिणाम होणार आहे. यामुळे भारताला परदेशातील ट्रान्सशिपमेंट बंदरांवर असलेले अवलंबित्व कमी करता येईल. तसेच माल पोहोचण्याचा वेळ कमी होऊन पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल.

विझिंजम बंदराचे महत्त्व भारताच्या सागरी व्यापारातील स्पर्धात्मक क्षमतेशी जोडलेले आहे. सध्या भारतातील 75 टक्क्यांहून अधिक कंटेनर ट्रान्सशिपमेंट माल परदेशातील बंदरांमधून हाताळला जातो. त्यामुळे वाहतूक खर्च आणि माल पोहोचण्याचा वेळ वाढतो. विझिंजममधून EXIM कामकाज सुरू झाल्यामुळे ही परदेशी बंदरांवरील अवलंबित्वाची समस्या कमी करण्यास मदत होईल. तसेच भारताच्या सागरी व्यापारातून निर्माण होणारा अधिकाधिक आर्थिक फायदा देशातच टिकवून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि भारताची सागरी क्षेत्रातील क्षमता अधिक मजबूत होईल.

पूर्व-पश्चिम प्रमुख समुद्री मार्गांच्या जवळ असलेल्या विझिंजम बंदराने जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता आधीच सिद्ध केली आहे. बंदराचे व्यावसायिक कामकाज 3 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत बंदराने 22.8 लाखांहून अधिक TEUs (20 फूट कंटेनरच्या समतुल्य) माल आणि 1,100 हून अधिक जहाजे हाताळली आहेत. यामध्ये 80 हून अधिक अल्ट्रा-लार्ज कंटेनर व्हेसल्स (ULCVs) चा समावेश आहे. विझिंजमने केवळ 10 महिन्यांत 10 लाख TEUs आणि 18 महिन्यांत 20 लाख TEUsचा टप्पा पार केला. भारताला भेट देणारे आतापर्यंतचे सर्वात मोठे कंटेनर जहाज एमएससी इरिना देखील विझिंजम येथे आले होते. या जहाजाची लांबी 399.99 मीटर असून त्याची क्षमता 24,346 TEUs आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात विझिंजम बंदरातून होणाऱ्या EXIM कामकाजाचा लाभ केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना मिळणार आहे. यामुळे दक्षिण भारतातील व्यवसायांना आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक नेटवर्कशी थेट जोडले जाण्याची अधिक चांगली संधी मिळेल. या बंदरामुळे बेंगळुरू, कोयंबतूर आणि तिरुपूर यांसारख्या उत्पादन आणि व्यावसायिक केंद्रांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल. तसेच लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, फ्रेट फॉरवर्डिंग आणि संबंधित सेवांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. या विकासामुळे 5,000 हून अधिक अप्रत्य आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सागरी वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसायांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

विझिंजमच्या पुढील टप्प्यात बंदराची क्षमता आणि पायाभूत सुविधा आणखी वाढवण्यात येणार आहेत. 16,000 कोटी रुपयांच्या फेज-2 विस्तारामुळे बंदराची वार्षिक क्षमता 57 लाख TEUsपर्यंत वाढेल. याशिवाय 1,200 मीटर लांबीची कंटेनर बर्थ, कायमस्वरूपी रेल्वे जोडणी, अधिक चांगली रस्ते कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स पार्क, वेअरहाऊसिंग आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. फेज-2 चे संपूर्ण काम डिसेंबर 2028 पर्यंत वेगाने पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या नव्या टप्प्यामुळे भारताच्या जागतिक व्यापाराच्या उद्दिष्टांमध्ये विझिंजम बंदराची भूमिका अधिक महत्त्वाची होणार आहे. तसेच दक्षिण भारतातील उद्योग आणि व्यवसायांसाठी व्यापार, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवीन संधी निर्माण होणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एचडीएफसी बँकने ‘विजिल आंटी सेज – लेझिनेस सेव्हज’, हा फसवणूक जागरूकता अभियान सुरू केला आहे

एचडीएफसी बँकने ‘विजिल आंटी सेज – लेझिनेस सेव्हज’, हा फसवणूक जागरूकता अभियान सुरू केल…