Home Uncategorized मोबाइल उत्पादनातील वाढ भारताच्या औद्योगिक क्षमतेचे द्योतक-हेमंत पाटील

मोबाइल उत्पादनातील वाढ भारताच्या औद्योगिक क्षमतेचे द्योतक-हेमंत पाटील

4 second read
0
0
8

no images were found

मोबाइल उत्पादनातील वाढ भारताच्या औद्योगिक क्षमतेचे द्योतक-हेमंत पाटील 


पुणे, :
भारताच्या मोबाइल फोन निर्मिती क्षेत्राने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली असून, देशांतर्गत उत्पादन, निर्यात आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्यवर्धनाला यामुळे मोठी चालना मिळाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरणाचे हे मोठे यश आहे, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१८) केले. केंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे भारताची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमता वाढत असल्याचे पाटील म्हणाले.

देशात वापरे जाणाऱ्या मोबाइल फोनपैकी सुमारे ९९.२ टक्के मोबाइल फोन देशातच तयार केले जात आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन उत्पादक देश आहे. २०१४ नंतर भारत मोबाइल फोनचा निव्वळ आयातदार राहिला नसून निव्वळ निर्यातदार देश बनला आहे, असे देखील पाटील म्हणाले.

लार्ज स्केल इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग (एलएसईएम) साठीच्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेमुळे मोबाइल उत्पादनाच्या इकोसिस्टीममध्ये सुमारे ९६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाल्याचे सरकारने सांगितले आहे. 

दरम्यान, १५ जुलै २०२६ रोजी मंजूर झालेल्या मोबाइल फोन मॅन्युफॅक्चरिंग योजनेला ६२,५०० कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे. ही पाच वर्षांची योजना आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत राबविण्यात येणार असून, उत्पादन वाढविणे, देशांतर्गत मूल्यवर्धन वाढविणे, पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविणे यावर भर देण्यात आला आहे. स्थानिक सोर्सिंग, भारतीय ब्रँड, डिझाइन तसेच संशोधन आणि विकासासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

मोबाइल उत्पादनातील वाढ ही भारताच्या औद्योगिक क्षमतेत होत असलेल्या परिवर्तनाचे संकेत देणारी आहे. उत्पादन आणि निर्यात वाढीसोबत देशांतर्गत मूल्यवर्धन वाढणे ही सकारात्मक बाब आहे,” असे हेमंत पाटील यांनी सांगितले. त्यांच्या मते, पुढील टप्प्यात देशांतर्गत घटक निर्मिती, कौशल्य विकास, संशोधन-विकास आणि भारतीय कंपन्यांची जागतिक बाजारपेठेतील उपस्थिती वाढविण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजन

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजन  क…