Home गौरव सन्मान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनालोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीर

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनालोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीर

12 second read
0
0
47

no images were found

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनालोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीर : कोल्हापुरात २१ ऑगस्टला प्रदान समारंभ

कोल्हापूर,  पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा “लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार” शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती व संयोजक डॉ. पांडुरंग भोसले यांनी आज ही घोषणा केली.

      ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे.

         त्याचप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार निपाणी येथील ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन. डी. जत्राटकर आणि ईश्वरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. संजय थोरात यांना याच समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पाली-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ सदर पुरस्कार देण्यात येतात.

        या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम सदाफुले, आनंदा कांबळे, विजय कांबळे, रविंद्र भारती, निमिषा भारती, शार्दुल भारती आदी या कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना …