Home Uncategorized मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध कामांचे लोकार्पण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध कामांचे लोकार्पण

8 second read
0
0
11

no images were found

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध कामांचे लोकार्पण

7 ऑगस्ट पासून रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण

 कोल्हापूर,  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांचे लोकार्पण रविवार, दि. 9 ऑगस्ट  रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

      कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि विविध विभागांतील समन्वयाची तयारी तपासण्यासाठी शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व खाजगी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना रुग्णालय परिसरात प्रवेश बंद राहील.

     रुग्णसेवा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली असून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस, सुरक्षा व इतर आपत्कालीन सेवांची वाहने, कार्यक्रमासाठी अधिकृत परवानाधारक (पासधारक) शासकीय वाहने तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.

     रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी रुग्णालय परिसरात येताना वाहतूक नियंत्रणाच्या सूचनांचे पालन करावे, शक्यतो पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे

मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे कोल्हापूर,: मातृदेवतांमध्ये सं…