Home Uncategorized पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोक

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोक

0 second read
0
0
5

no images were found

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोक

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरापर्यंत दर्जेदार शिक्षण संस्था उभारून त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सहकार आणि सेवाभाव यांचा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला.”

“त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशात घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने समाजाचा मोठा आधारवड हरपला आहे,” असेही श्री. आबिटकर यांनी नमूद केले.

दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री श्री. आबिटकर यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की, दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि असंख्य विद्यार्थ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूर येथे राज्यपाल क्रीडा महोत्सव आयोजित करण्याबाबत तसेच कोल्हापूरच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी शासनास मार्गदर्शन करावे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे राज्यपालांना निवेदन

कोल्हापूर येथे राज्यपाल क्रीडा महोत्सव आयोजित करण्याबाबत तसेच कोल्हापूरच्या क्रीडा पायाभूत…