Home Uncategorized विनापरवाना रुग्णालय, सोनोग्राफी मशीन व गर्भपात प्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई

विनापरवाना रुग्णालय, सोनोग्राफी मशीन व गर्भपात प्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई

22 second read
0
0
7

no images were found

विनापरवाना रुग्णालयसोनोग्राफी मशीन  गर्भपात प्रकरणी डॉचंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई

कोल्हापूर,  : शहरात गर्भलिंग निदान करून बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना छाप्यात पकडण्यात आले आहे.  महानगरपालिकेच्या नोंदीनुसार, डॉ. गायकवाड यांनी सन २०२० मध्ये कदमवाडी रोड येथील प्रतिमा हॉस्पिटलची नर्सिंग होम ॲक्टअंतर्गत नोंदणी केली होती. या नोंदणीची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर परवान्याचे नूतनीकरण न केल्याने महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती.

            यावेळी डॉ.चंद्रकांत गायकवाड यांनी रुग्णालय बंद असल्याचे लेखी स्वरूपात लिहून दिले आणि तेथे रहात होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता तेथे कोणताही रुग्ण दाखल नसल्याचे, तपासणी विभाग बंद असल्याचे, रुग्णालयात बेड किंवा कर्मचारी कार्यरत नसल्याचे तसेच बाह्यरुग्ण व आंतररुग्ण नोंदवहीत कोणत्याही रुग्णांच्या नोंदी नसल्याचे आढळून आले. या अहवालाच्या आधारे रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. सध्या संबंधित ठिकाणी आढळून आलेले सोनोग्राफी मशीन हे पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत नसल्याचे तसेच गर्भपात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक परवानाही घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस यंत्रणेमार्फत सुरू असून तपासाअंती विनापरवाना रुग्णालय चालविणे, विनापरवाना सोनोग्राफी मशीन बाळगणे तसेच आवश्यक नोंदणी व परवान्याविना गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्याविरुद्ध आरोग्य विभागामार्फत नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

खा .महाडिक यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली   

 खा .महाडिक यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली      …