Home सामाजिक कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,

कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,

1 second read
0
0
11

no images were found

कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,:भाजपा महिला मोर्चाची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व जलद चौकशी करून संबंधित आरोपींना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची, फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. तसेच तपास त्वरीत पूर्ण करून सक्षम पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी या गुन्ह्यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रांचा बेकायदेशीर वापर, अशा यंत्रांचा पुरवठा करणारे, गर्भलिंग निदानासाठी महिलांना प्रवृत्त करणारे तसेच या बेकायदेशीर कृत्यांना सहाय्य करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था व ठिकाणांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, भविष्यात जिल्ह्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताचे प्रकार घडू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविणे, संशयित केंद्रांची नियमित तपासणी करणे आणि पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि कन्या भ्रूण संरक्षणासाठी अशा गुन्ह्यांबाबत कोणतीही हयगय न करता निष्पक्ष, पारदर्शक व तातडीने कारवाई करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाला करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्यामधील संपूर्ण रॅकेटवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, रीमा पालनकर, पल्लवी देसाई, उमा पवार, सुजाता पाटील ई. भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्‍वास

केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल…