Home Uncategorized पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

18 second read
0
0
9

no images were found

पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

  • पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्णय

मुंबई, : पशुधन पर्यवेक्षक / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्यात दहावी नंतर दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम बंद करून बारावी विज्ञान नंतर दोन वर्षाचा पशुविज्ञान विषयासह पदविका अभ्यासक्रम चालू करण्यासंदर्भात तपासून निर्णय घेण्यात येईल, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.

    पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता, पदांचे तर्कसंगत वाटप, पदोन्नती, रिक्त पदभरती, पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा, तालुका स्तरावरील अधिकार तसेच पशुवैद्यकीय संस्थांमधील आवश्यक मनुष्यबळ या विषयांवर चर्चा करण्यात आली.

     यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील, सहसचिव नि.भा. मराळे, यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच पशुचिकित्सा व्यवसायी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पाटील, कार्याध्यक्ष डॉ. व्ही.टी. उंबरहांडे,  डॉ. आर.एम. गावित, डॉ. एम.पी. कानोळे, डॉ. के.जी. चौलर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     पशुधन पर्यवेक्षक आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांना विविध योजना, लसीकरण मोहीम, शिबिरे आणि क्षेत्रीय कामकाजासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सातत्याने जावे लागते. या कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याची मागणी रास्त असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

   विभागाच्या पुनर्रचनेनंतर मंजूर झालेल्या पदांच्या ooh_₹₹वाटपाबाबतही यावेळी चर्चा झाली. ज्या ठिकाणी पशुधनाची संख्या अधिक असून पशुवैद्यकीय सेवा, लसीकरण आणि विविध योजनांची मागणी जास्त आहे, अशा ठिकाणी सहायक पशुधन विकास अधिकारी पदांची आवश्यकता विचारात घेण्यात आली असून यासंदर्भात पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

     मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेकडील पशुधन पर्यवेक्षक आणि सहायक पशुधन विकास अधिकारी पदांच्या प्रमाणानुसार जिल्हानिहाय संख्या निश्चित करणे पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कार्यभार आणि पशुधनाची संख्या विचारात घेऊन स्थाननिश्चिती करणे, राज्य संवर्ग आणि जिल्हा परिषद संवर्गांतील सहायक पशुधन विकास अधिकारी पदांच्या प्रमाणातील तफावत आदींसंदर्भातही संबंधित विभागाशी चर्चा करण्यात येईल.

     तालुका स्तरावरील पशुधन पर्यवेक्षक आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांची पदे कायम ठेवणे व रिक्त पदे भरण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची पदे पुनर्रचनेनुसार समायोजन करणेबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     राज्यात दहावीनंतर सुरू असलेल्या दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दर्जाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दहावीनंतरच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाऐवजी बारावीनंतर प्रवेशाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात तसेच सध्याच्या पदविका अभ्यासक्रमात पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा किंवा पशुविज्ञानाशी संबंधित विषयांचा पुरेसा समावेश करण्यासंदर्भात पशुविज्ञान विद्यापीठाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

     पदांचे तर्कसंगत वाटप, रिक्त पदांची भरती, प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आवश्यक कार्यसुविधा उपलब्ध करून पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी भर दिला.

    कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल कर्मचारी संघटनेच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५…