Home उद्योग अदाणी पॉवरने वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतील विक्रमी आर्थिक निकाल जाहीर केले

अदाणी पॉवरने वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतील विक्रमी आर्थिक निकाल जाहीर केले

24 second read
0
0
8

no images were found

अदाणी पॉवरने वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतील विक्रमी आर्थिक निकाल जाहीर केले

देशातील सर्वात मौल्यवान ऊर्जा ब्रँड म्हणून अव्वल स्थान; महसूल, ईबीआयटीडीए , नफा आणि वीज उत्पादनात नवे उच्चांक

अहमदाबाद, : अदाणी समूहातील कंपनी आणि भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी औष्णिक वीज उत्पादक कंपनी अदाणी  पॉवर लिमिटेड (एपीएल) ने वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. देशभरात वाढलेल्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी नोंदवत महसूल, ईबीआयटीडीए , करानंतरचा नफा (पीएटी), वीज उत्पादन आणि वीज विक्री या सर्वच बाबतीत विक्रमी यश संपादन केले आहे. याशिवाय, ब्रँड फायनान्सच्या 2026 च्या अहवालात अदाणी पॉवरला भारतातील सर्वात मौल्यवान ऊर्जा ब्रँडचा मान मिळाला असून, अदाणी ब्रँडला देशातील आठवा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून स्थान मिळाले आहे.

वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 31 अब्ज युनिट (बीयू) वीज उत्पादन आणि 28.8 अब्ज युनिट वीज विक्रीचा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम प्रस्थापित केला. कंपनीचा एकूण महसूल 33 टक्क्यांनी वाढून 19,322 कोटी रुपये झाला, तर अहवालित ईबीआयटीडीए  36 टक्क्यांनी वाढून 8,369 कोटी रुपये झाला. याच कालावधीत करानंतरचा निव्वळ नफा (पीएटी) 47 टक्क्यांनी वाढून 4,867 कोटी रुपये झाला. सातत्यपूर्ण व्यवसायातून मिळालेला महसूल 17,936 कोटी रुपये आणि ईबीआयटीडीए  6,983 कोटी रुपये इतका राहिला, ज्यामुळे कंपनीची मजबूत आर्थिक क्षमता आणि कार्यक्षम संचालन पुन्हा अधोरेखित झाले.

देशातील वाढत्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने विस्ताराला वेग दिला आहे. जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत 180 मेगावॅट चूर्क औष्णिक वीज प्रकल्पजयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडमधील 24 टक्के हिस्सा आणि प्रयागराज पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडमधील 11.49 टक्के हिस्सा अधिग्रहित करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईडीसीएल) सोबत 1,600 मेगावॅट वीज पुरवठ्यासाठी 25 वर्षांचा दीर्घकालीन करार करण्यात आला आहे. कंपनीचे 45 गीगावॅट उत्पादन क्षमतेपर्यंत विस्ताराचे उद्दिष्ट वेगाने पूर्ण करण्यासाठी विविध प्रकल्पांवर काम सुरू असून, कोरबा, महान, रायपूर, रायगड आणि मिर्झापूर येथील प्रकल्प नियोजित वेळापत्रकानुसार प्रगती करत आहेत.

या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना अदाणी  पॉवर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. ख्यालिया म्हणाले, “अदाणी  पॉवरने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि विश्वासार्ह व्यवसाय मॉडेलची ताकद सिद्ध केली आहे. सातत्यपूर्ण व्यवसायातून मिळालेला विक्रमी ईबीआयटीडीए  आमच्या उत्कृष्ट संचालनाचे द्योतक आहे. 45 गीगावॅट उत्पादन क्षमतेच्या दिशेने आमची वाटचाल वेगाने सुरू असून, जयप्रकाश समूहाच्या वीज मालमत्तांच्या अधिग्रहणासोबतच आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये तसेच अणुऊर्जा क्षेत्रातील संधींचाही अभ्यास करत आहोत. भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक दरात वीज उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता कायम राहील.”

कंपनीने पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी) क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे. अंतर्गत औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये विशिष्ट जलवापर 2.42 घनमीटर प्रति मेगावॅट तास इतका राखण्यात आला असून, तो नियामक मर्यादेपेक्षा सुमारे 31 टक्के कमी आहे. तसेच वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 93 टक्के राखेचा (ऍश) पुनर्वापर साध्य केला आहे. मजबूत आर्थिक स्थिती, कमी कर्जभार, सातत्यपूर्ण नफा आणि नियोजित विस्तारामुळे अदाणी  पॉवर भारतातील ऊर्जा क्षेत्रातील आपले नेतृत्व आणखी मजबूत करण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी न…