Home क्राईम कोल्हापुरात वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापुरात वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक

3 second read
0
0
131

no images were found

कोल्हापुरात वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर : येथील राजारामपुरीमध्ये वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मालक सुधीर दिगंबर वळंजुवाणी (५६ , रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) व एजंट प्रसाद संजय पाटील (२५ , रा. तिरपण, ता. पन्हाळा) अशी संशयितांची नावे आहे. दोन पीडित युवतींची सुटका करण्यात आली. राजारामपुरी सारख्या पॉश एरियात वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुधीर वळंजूवाणी याने राजारामपुरी आठव्या गल्लीमध्ये सर्व जाती-धर्मांसाठी वधू-वर सूचक केंद्र सुरू केले आहे. बेसमेंटमध्ये असणाऱ्या या कार्यालयाच्या आडून तो गरीब व असहाय्य महिलांना पैशाच्या आमिषाने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होता. याची माहिती मिळाल्याने पोलिस मुख्यालयातील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने राजारामपुरी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दोघा संशयितांना पकडले. तसेच पीडित युवतींची सुटका केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…