no images were found
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये ग्राहकांना 4,666 कोटीं रुपयांचे लाभ दिले
- आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये टर्म प्लॅन व्यवसायात 60.4% वाढ नोंदवली
- आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये 99.3% दाव्यांचा (क्लेमचा) यशस्वी निपटारा केला
- करानंतरच्या नफा 27.8% वाढून 386 कोटीं रुपये झाला
मुंबई, : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने जून 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 27.8% वाढ नोंदवत 386 कोटीं रुपयांचा नफा कमावला. याच कालावधीत कंपनीच्या टर्म प्लॅन (रिटेल प्रोटेक्शन) व्यवसायात वार्षिक 60.4% वाढ झाली. तसेच, कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे नाव बदलून ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
कंपनीचे एमडी आणि सीईओ अनुप बागची म्हणाले, ” ग्राहकांना सर्वाधिक प्राधान्य देणे हा आमच्या धोरणाचा मुख्य भाग आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये आमचा दावा निकाली काढण्याचा दर 99.3% राहिला. तसेच, तपासाची गरज नसलेले दावे सरासरी एका दिवसात निकाली काढण्यात आले. यावरून गरजेच्या वेळी ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांना तत्पर मदत करण्याची आमची बांधिलकी दिसून येते. या तिमाहीत आम्ही मृत्यू दाव्यांपोटी 1,306 कोटींचे दावे मंजूर केले, तर मुदतपूर्ती आणि सर्व्हायव्हल बेनिफिट्स म्हणून 3,360 कोटी रुपये ग्राहकांना दिले. त्यामुळे आमच्या पॉलिसीधारकांना वेळेवर आर्थिक मदत आणि संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न कायम असल्याचे दिसून येते. तसेच, आर्थिक वर्ष 2026 मध्ये आम्ही मृत्यू दाव्यांपोटी 5,149 कोटी रुपये आणि मुदतपूर्ती आणि सर्व्हायव्हल बेनिफिट्स म्हणून 15,363 कोटीं रुपये रक्कम ग्राहकांना अदा केले.”
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीतमध्ये कंपनीचा करानंतरचा नफा (PAT) मागील वर्षाच्या तुलनेत 27.8% वाढून 386 कोटी रुपये झाला. विशेष म्हणजे, या तिमाहीत कंपनीच्या रिटेल प्रोटेक्शन (टर्म प्लॅन) व्यवसायात 60.4% वाढ नोंदवण्यात आली. ही वाढ भारतातील लोकांच्या आर्थिक सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी दर्शवते.
कंपनी आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी मोठ्या प्रमाणातील व्यवसायातून मिळणारे फायदे, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डिजिटल सुविधांचा सातत्याने वापर करत राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या बचत व्यवसायातील खर्च-ते-प्रीमियम (कॉस्ट-टू-प्रीमियम) प्रमाण 50 बेसिस पॉइंटने कमी होऊन 13.6% झाले आहे. यामुळे कंपनीला नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास, डिजिटल सुविधा अधिक मजबूत करण्यास आणि भविष्यातील वाढीस चालना देण्यास मदत होणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने अलीकडेच आवश्यक नियामक मंजुरीच्या अधीन राहून कंपनीचे नाव बदलून ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवीन नाव आयसीआयसीआय ब्रँडवरील विश्वास, मजबूत ओळख आणि दीर्घ अनुभव दर्शवते. कंपनीचा व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू असून, ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि भारतातील वेगाने वाढणाऱ्या लाइफ इन्शुरन्स बाजारातील मोठ्या संधींचा फायदा घेणे यावर कंपनीचा भर कायम राहणार आहे.