Home सामाजिक कोरोनानंतर कुडित्रेला पुन्हा बससेवा – महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोनानंतर कुडित्रेला पुन्हा बससेवा – महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते शुभारंभ

41 second read
0
0
8

no images were found

कोरोनानंतर कुडित्रेला पुन्हा बससेवा – महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत ग्रामपंचायत कुडित्रे येथे गुरुवारी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. या बससेवेचा शुभारंभ महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या हस्ते झाला.

            कोरोना महामारीच्या काळापासून बसची अपुरी उपलब्धता आणि काही बस नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील अनेक बससेवा बंद होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी बंद असलेल्या बस दुरुस्त करून पुन्हा सेवेत आणण्याचा तसेच २० नवीन डिझेल बस खरेदीचा प्रस्ताव पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार बंद पडलेल्या ग्रामीण बसमार्गांना टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचे नियोजन परिवहन उपक्रमाने केले असून, त्याचाच एक भाग म्हणून कुडित्रे गावात बससेवा सुरू करण्यात आली.

           या नव्या सेवेमुळे कुडित्रे येथील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित व नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सक्षम होणार आहे.

            यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कौसर बागवान, नगरसेविका सौ. संगीता सावंत, जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील, परिवहन विभागाचे अकीवाटे, खरमाटे, विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सेवा संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रूग्णालयांचा समावेश, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रूग्णालयांचा समावेश, खासदार धनंजय मह…