Home Video डीकेटीई व जर्मनीयेथील इटा यांच्यात सामंजस्य करार डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना सर्वखर्चासह जर्मनी येथे प्रशिक्षणाची संधी

डीकेटीई व जर्मनीयेथील इटा यांच्यात सामंजस्य करार डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना सर्वखर्चासह जर्मनी येथे प्रशिक्षणाची संधी

14 second read
0
0
6

no images were found

डीकेटीई व जर्मनीयेथील इटा यांच्यात सामंजस्य करार
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना सर्वखर्चासह जर्मनी येथे प्रशिक्षणाची संधी

इचलकरंजी (प्रतिनिधी):- जर्मनी येथील अ‍ॅकेन विद्यापीठ येथील टेक्स्टाईल एज्युकेशनसाठी नामांकित अशी इटा (इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी) व डीकेटीर्ईचे टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट या दोहोंमध्ये दिल्ली येथील भारत टेक्स मध्ये विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार झाला. या कराराअंतर्गत डीकेटीईचे टेक्स्टाईलचे विद्यार्थी सहा महिने प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे जातील तसेच त्यांचा सर्व खर्च इटा यांचेमार्फत होईल प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर त्यांना प्लेसमेंट देखील देण्यात येणार आहेत हे या कराराचे मुख्य वैशिष्ठय आहे. जागतिक स्तरावरील नामांकित संस्थासोबत सहकार्य वाढविणे आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण व उदयोगविश्‍वाशी जोडणे या डीकेटीईच्या दूरदृष्टीला या करारामुळे नवे बळ मिळाले असून, संस्थेच्या जागतिक वाटचालीतील हा आणखी एक अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.
भारत टेक्स २०२६ या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनात जर्मनीतील अ‍ॅकेन विद्यापीठाचे इटा (इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी), या जागतिक किर्तीच्या संस्थेसोबत लेटर ऑफ इंटेट वर स्वाक्षरी करुन आंंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाउल उचलले आहे. इंडो जर्मन यंग लिडरशिप प्रोग्रॅम अंतर्गत झालेल्या या करारावर इटा ग्रुप, अ‍ॅकेन यांच्या वतीने प्रा. थॉमस ग्रीस तर डीकेटीईच्या वतीने डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, डीन डॉ एस.बी.व्हनबटटे, डॉ एस.एम. लांडगे यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी वस्त्रोद्याग आयुक्त वृंदा देसाई (आयआरएस), वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक अश्‍विनीकुमार पांडे (आयएएस) यांची प्रमुख उपस्थिती होती.
डीकेटीईने सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्याना युरोप खंडामध्ये विनाखर्च उच्च प्रशिक्षणाची सोय केल्यामुळे डीकेटीईची शैक्षणिक क्षेत्रात असणारी गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी गगनभरारी सिध्द होत आहे. जगभरात असलेल्या डीकेटीईचा नावलौकीक यामुळेचे येथील विद्यार्थी जागतिक पातळीवर झेप घेत आहेत व देशाचे आणि इचलकरंजीचे नांव उज्वल करीत आहेत.
करारामध्ये विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय नेतृत्व विकास, जर्मन भाषा प्रशिक्षण, शैक्षणिक देवाण घेवाण, संयुक्त संशोधन तसेच जर्मनीतील उदयोगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव अशा जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था विद्यार्थ्यांच्या सहभागाचा व्यापक आराखडा तयार करुन दीर्घकालीन शैक्षणिक व संशोधन सहकार्य विकसीत करणार आहेत.
या करारासाठी डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. करारासाठी संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ. यु.जे. पाटील तसेच प्रा.डॉ.एम.सी.बुर्जी यांचे सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कलाकारांनी सांगितले त्यांचे आवडते पावसाळी खाद्यपदार्थ

कलाकारांनी सांगितले त्यांचे आवडते पावसाळी खाद्यपदार्थ      पावसाळ्याचे आगमन…