Home Uncategorized आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगावला ३ दिवसांतून एकदा पाणी देऊ – महापौर सौ.रुपाराणी निकम

आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगावला ३ दिवसांतून एकदा पाणी देऊ – महापौर सौ.रुपाराणी निकम

1 min read
0
0
10

no images were found

आर.के.नगरमोरेवाडीपाचगावला  दिवसांतून एकदा पाणी देऊ – महापौर सौ.रुपाराणी निकम

शहराच्या हद्दवाढीमध्ये तुम्ही आमच्यात यावे तुमची सर्व जबाबदारी आंम्ही घेऊ

कोल्हापूर  : आर.के.नगर, मोरेवाडी आणि पाचगाव परिसरातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका पाणी पुरवठा नियोजनाचा सखोल अभ्यास करत असून, या परिसरातील कनेक्शनधारकांना किमान तीन दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी दिली. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात मोरेवाडी, पाचगाव आणि आर.के.नगर परिसरातील पंचायत सदस्य तसेच नागरिकांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

            पाणी समस्येबाबत या भागातील नागरिकांनी या भागात सध्या ३ हजारांपेक्षा जास्त नळ कनेक्शनधारक आहेत. पूर्वी या परिसरात एक दिवसाआड पाणी मिळत होते, मात्र आता ८ ते १० दिवस पाणी मिळत नाही. भागातील बोअरिंगचे पाणीही आटले असल्याने नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी द्यावे अशी विनंती नागरिकांनी केली.

            जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी पाणी टंचाईची तांत्रिक कारणे स्पष्ट करताना पूर्वी सुभाषनगर पंपिंगवरून राजेंद्रनगर, मोरेवाडी, पाचगाव व वैभववाडी येथे पाणी दिले जात होते. मात्र, काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने सध्या तेथील उपसा पूर्णपणे बंद आहे. सध्या शहराला शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. या ठिकाणावरुन होणारा दैनंदिन पाणी पुरवठा ४० ते ५० एमएलडी पाणी कमी मिळत आहे. या भागाला ३ ते ४ दिवसांतून एकदा पाणी देण्याचे नवे शेड्युल निश्चित करण्यात येईल. या भागातील ग्रामपंचायतींची ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच येथे अनधिकृत कनेक्शन्स आणि थेट मोटारी लावण्याचे प्रमाण जास्त आहे. ही अनधिकृत नळ जोडणी शोधण्याची आणि मोटारी जप्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी घ्यावी असे आवाहन जल अभियंत्यांनी केले.

            महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी बोलताना मोरेवाडी, पाचगांव, आर.के.नगर परिरातील पंचायत सदस्य तसेच नागरीक या ठिकाणी आलेत त्यांना चांगल्या पध्दतीने कसे पाणी देता येईल याचा अभ्यास करुन त्याचे नियोजन करु.  काळम्मवाडी धरणातील पाणी उपसा बंद असल्याने बालिंगा, शिंगणापूर, नागदेववाडी येथून होणारा पाणी पुरवठा कशा पध्दतीने आपल्यापर्यत करता येईल याचे नियोजन करु. शहराच्या हद्दवाढीमध्ये तुम्ही आमच्यात यावे तुमची सर्व जबाबदारी आंम्ही घेऊ. या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी 8 ते 10 दिवसात नक्कीच या भागाला पाणी पुरवठा सुरळीत करु. पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि अनधिकृत मोटारी जप्त करण्यासाठी महापालिकेच्या पथकाला माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

            आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले की महापालिका पाणी देण्यास तयार आहे, मात्र शहराप्रमाणेच ग्रामीण भागात पाणी नियोजनाची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतींची आहे. कोल्हापूर शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायतींची मिळून महापालिकेकडे ८ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे, ती ग्रामपंचायतींनी तात्काळ भरावी. ग्रामपंचायतींनी पथके नेमून अनधिकृत मोटारी जप्त कराव्यात. शहराची हद्दवाढ होऊन ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यास या भागाची १०० टक्के जबाबदारी आणि सर्व सुविधा महापालिका देईल असे सांगितले.

            यावर पाचगावचे सदस्य सागर दळवी यांनी, “महापालिकेचे पाणी चांगल्या दर्जाचे असल्याने आम्हाला त्याची सवय झाली आहे. आमचा हद्दवाढीत येण्यास कोणताही विरोध नसून तसे पत्र आम्ही पूर्वीच दिले आहे असे नमूद केले.

            यानंतर बैठकीत बापट कॅम्प परिसरातील महिलांनी गेल्या ६ महिन्यांपासून होत असलेल्या कमी पाणी पुरवठ्याबाबत तक्रार केली. तसेच जवाहरनगर येथील हद्दीच्या वादामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी तात्काळ पावले उचलत पाईपलाईन बदलण्यासाठी १४ लाखाचा निधी देण्याची ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली. तसेच पाणी गळती काढण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि पुढील ३ ते ४ दिवसांत पाणी सोडणारे चावीवाले व शाखा अभियंता यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.

            यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, गटनेते शारगंधर देशमुख, आदिल फरास, नगरसेवक विजेंद्र माने, नगरसेविका सौ.राजनंदा महाडीक, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मोरेवाडी माजी उपसरपंच संजय वास्कर, सदस्य संभाजी मोरे, पाचगाव ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी, महेश पाटील, अमोल गायकवाड, अमोल गवळी, स्वप्निल गाडगीळ, अक्षय गाडगीळ, मनोज बागे, मिलिंद शेटे, मोरेवाडीचे प्रमोद हुदले, संभाजी मोरे, आनंदा मोरे व नागरीक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सन्मान

एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्त…