no images were found
मिळकत नाव हस्तांतरणासाठी ७ जुलै रोजी विशेष कॅम्प
कोल्हापूर, : शहरातील अनेक मिळकतींवर बिल्डरकडून खरेदी करूनही अथवा वारसा हक्काने मिळकत प्राप्त होऊनही मालकाचे नाव महापालिकेच्या अभिलेखात हस्तांतरित झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत विभागीय कार्यालय क्रमांक ४ (छत्रपती ताराराणी मार्केट) अंतर्गत मिळकत नाव हस्तांतरणासाठी विशेष एकदिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
हा कॅम्प दि. ७ जुलै २०२६ रोजी विभागीय कार्यालय क्रमांक ४, छत्रपती ताराराणी मार्केट येथे होणार आहे. नाव हस्तांतरण बाकी असलेल्या सर्व मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या मिळकतीवर नाव हस्तांतरित करून घ्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
यासाठीआवश्यक कागदपत्रे मालकीसंबंधित ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड (तीन महिन्यांच्या आतील) – मूळ प्रत, इंडेक्स–२ची छायाप्रत, सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा घरफाळा भरल्याच्या पावतीची छायाप्र, हस्तांतरण शुल्क – खरेदी रकमेच्या ०.१ टक्के सादर करावीत.
महापालिकेने नागरिकांनी या विशेष कॅम्पचा लाभ घेऊन मिळकतीवरील नाव हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.