Home Uncategorized घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे अखेरचे सहा दिवस आज अखेर 30 कोटी 14 लाखाचा भरणा

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे अखेरचे सहा दिवस आज अखेर 30 कोटी 14 लाखाचा भरणा

18 second read
0
0
27

no images were found

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे अखेरचे सहा दिवस आज अखेर 30 कोटी 14 लाखाचा भरणा

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि. 01 एप्रिल ते  दि.30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केलेस महापालिकेच्या करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि.1 एप्रिल 2026 ते दि.24 जून 2026 अखेर एकूण 63,112 एवढ्या मिळकतधारकांनी एकूण 30 कोटी 14 लाख इतकी रक्कम भरणा केलेली आहे. या सवलत योजनेमधून नागरीकांना 6 टक्के सवलत योजनेप्रमाणे 1 कोटी 32 लाख 17 हजार 424 रुपये रक्कम सवलत आज अखेर देण्यात आलेली आहे.

            नागरिकांच्या सोईसाठी महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9:00 ते दुपारी 4:30 या कालावधीमध्ये तसेच सुट्टीचे दिवशीसुद्धा सुरु ठेवलेली आहेत. नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्रामधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी ज्या मिळकतधारकांनी अद्यापही घरफाळा भरणा केला नाही त्यांनी आपला घरफाळा भरणा या सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन – मंत्री हसन मुश्रीफ

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन R…