Home Uncategorized ३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

6 second read
0
0
12

no images were found

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

कोल्हापूर,  : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत (निक्षय मित्र) क्षयरुग्णांना पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरात राबविण्यात आलेल्या ‘निक्षय गीत मैफिल’ या नाविन्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. ‘३६५ दिवस, ३६५ निक्षय गीत मैफिली’ हे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करत या उपक्रमांतर्गत ३६५ मैफिलींचे आयोजन करण्यात आले.

    जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्याने जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था (स्नेहसंगीत प्रतिज्ञा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे विशेष सहकार्य लाभले.

    जागतिक संगीत दिनानिमित्त २१ जून २०२५ रोजी सुरू झालेला हा उपक्रम २० जून २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाला. साने गुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओमध्ये प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था – स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे राजेंद्र चौगुले, अभिजीत पाटील, अमरसिंग राजपूत, नीलांबरी जाधव, अनिल मोरे, कृष्णात जमदाडे आणि प्रशांत जोशी आदी कलाकारांनी फेसबुक लाईव्ह तसेच प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून या मैफिली सादर केल्या.

    या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून जाणीव फाउंडेशनमार्फत ७९ क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. यासाठी स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे प्रशांत जोशी आणि जाणीव फाउंडेशनच्या सौ. सुषमा बटकंडली यांचे विशेष योगदान लाभले.

    उपक्रमाच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे प्रशांत जोशी तसेच सर्व गायकवृंदाचा सत्कार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संगीताची ताकद आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून क्षयरुग्णांना आधार देणारा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अदाणी समूहाचे 2035 पर्यंत 10 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे लक्ष्य

अदाणी समूहाचे 2035 पर्यंत 10 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे लक्ष्य नवी दिल्ली, : –…